Ad will apear here
Next
विद्यार्थी सहायक समितीतर्फे पोपटराव पवार यांचे व्याख्यान
पोपटराव पवारपुणे : विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व थोर गणितज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती आणि उचित माध्यम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवार, दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता सेनापती बापट रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. यातील पहिले व्याख्यान अहमदनगर येथील हिवरेबाजार या आदर्श गावाचे सरपंच पोपटराव पवार यांचे होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

डॉ. आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात या व्याख्यानमालेचा समावेश आहे. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे हे व्याख्यान होणार आहे, असे विद्यार्थी सहायक समितीतर्फे कळविण्यात आले आहे.


कार्यक्रमाविषयी 
विद्यार्थी सहायक समिती व्याख्यानमाला 
स्थळ : लजपतराय विद्यार्थी भवन, सेनापती बापट मार्ग,पुणे.  
दिवस व वेळ : शनिवार, २२ डिसेंबर, सायंकाळी सहा वाजता 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZOOBV
Similar Posts
‘राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाई गरजेची’ पुणे : ‘स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरुणाई, मात्र अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. तरुणांनी हा विचार बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा. कारण राष्ट्र निर्मितीसाठी सकारात्मक तरुणाईची
कथ्थक नृत्यातून उलगडले चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब पुणे : चित्रपटांतील गाणी, कविता शास्त्रीय नृत्यातून मांडत प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्यातून चित्रपटसृष्टीचे प्रतिबिंब उलगडले. गणेश वंदना, कृष्णलीला, दुर्गेचे रूप यांच्या बहारदार सादरीकरणाने शर्वरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘वन्स मोअर’ आणि टाळ्यांचा कडकडाटात दाद मिळवली.
विद्यार्थी सहायक समितीचे प्रवेश सुरू पुणे : पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास आणि भोजनासाठी येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकतो. या प्रवेश प्रक्रियेला एक जूनपासून सुरुवात झाली आहे.
अहमदनगर जिल्हा मित्रमंडळातर्फे रविवारी स्नेहमेळावा पुणे : अहमदनगर जिल्हा मित्रमंडळातर्फे मुळचे अहमदनगरचे रहिवासी असलेले, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर येथील ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स’मध्ये हा मेळावा होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language